लोक सहभागातून येऊरची काच आणि प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता – संजय केळकर यांचा उपक्रम

काचेच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचा पसारा यामुळे बकाल झालेल्या येऊरने अखेर मोकळा श्वास घेतला. पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे तीन किलो मिटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून येऊरच्या जंगलाची काच, प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता करण्यात आली. यावेळी तब्बल ३० मोठया पिशव्या भरून कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंढरवडा ठाण्यात सुरु असून तसेच महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आमदार संजय केळकर यांनी नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना येऊर स्वच्छता अभियान करिता आवाहन केले होते आणी दोनच दिवसाच्या आवाहनाला 400 च्या वर नागरिक उपस्थित होते.

संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातही मोठया प्रमाणात ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आमदार संजय केळकर आणि १६ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत येऊरच्या जंगलात रविवारी स्वच्छता अभियान राबवले. वास्तविक येऊर म्हणजे निसर्गाचे वरदान लाभालेला परिसर. नैसर्गिक ओढे, हिरवाईने बहरलेले जंगल. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये येथे काँक्रीटचे जंगल उभे राहिले असून ढाबा, हॉटेलची गर्दी झाली आहे. मद्यपींसाठी तर हे ठिकाण पार्टी आणि हुल्लडबाजीचे ठिकाण झाले आहे. परिणामी येऊरला बकालपणाचे स्वरुप प्राप्त होऊ लागले आहे. जागो जागी फेकून देण्यात आलेले दारु आणि बिअरच्या बाटल्या, खाण्याची पाकीटे, प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा खच दिसतो.
ठाणे शहराला ऑक्सिजन देणारे हे जंगल प्लास्टिक, काचांनी घायाळ बनले आहे. त्यातून या जंगलाची मुक्तता करण्यासाठी आमादर संजय केळकर गेल्या तीन वर्षांपासून येथे स्वच्छता मोहिम राबवत आहेत. यावर्षीही त्यांनी ४०० स्वयंसेवकांसह येथे श्रमदान केले. पतंजली, हरिआली, ब्रम्हांड कट्टा, समर्थ भारत, रोटरी, इंस्ट्रीअल इस्टेट यासरख्या १६ संस्थांचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी ठिक सात वाजता येऊरच्या पायथ्यापासून या अभियानाला सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांझुडपांमधून यावेळी मोठया प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला. ३० ते ३५ मोठया बॅग भरून कचरा, काच व प्लास्टिक यावेळी गोळा झाल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading