पनवेल जवळ कालच्या मालगाडी अपघाताचे दुसऱ्या दिवशी ही मध्य रेल्वेवर परिणाम;दिव्यात प्रवाशांचा रेल रोको

मध्य रेल्वे हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडीच्या अपघातामुळे रविवारी दुसऱ्या दिवशी देखील कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. मात्र दिव्याा वरून कोकणाकडे जाणाऱ्या काही गाड्या रेल्वे ट्रॅक वरच उभ्या असून यात अनेक प्रवासी कालपासून बसून आहेत. या प्रवाशांना खाण्याची पाणी पिण्याची सोय नसल्याने हे प्रवासी संतप्त झाले असून आज या प्रवाशांनी दिवा रेल्वे स्टेशन वर रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. जीआरपी पोलिसांनी व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या आंदोलनामुळे मध्य रेल्वे ची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल देखील पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading