लोकमान्यनगर येथील स्व. रामचंद्र ठाकुर तरण तलाव खुला

लोकमान्यनगर येथील स्व. रामचंद्र ठाकुर तरण तलाव खुला करण्यात आला आहे. लोकमान्यनगर येथील स्व. रामचंद्र ठाकुर तरण तलाव कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षांपासून जनतेसाठी बंद करण्यात आला होता. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या निर्देशानुसार सर्व तरण तलाव जनतेसाठी बंद ठेवण्यात आले होते त्यामध्ये ह्या तरण तलावाचा सुध्दा समावेश होता. तसेच महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी तरण तलाव बांधत असताना योग्य त्या तज्ञाकडून तरण तलावाच्या बांधकामाला मार्गदर्शन न घेतल्यामुळे त्यामधील फिल्टरेशन प्लांट चुकीच्या पध्दतीने बसविण्यात आला होता. त्यामुळे तरण तलावाचे पाणी फिल्टरेशन प्लांटमध्ये जाऊन वारंवार फिल्टरेशन प्लांट बंद पडत होता. त्यामुळे तरण तलाव पोहण्यायोग्य नसल्यामुळे महानगरपालिकेकडून पुर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. कोरोनामुळे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने फिल्टरेशन प्लांटचा खर्च महानगरपालिका करीत नव्हती. परंतू, आमदार प्रताप सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा फिल्टरेशन प्लांट दुरूस्त करून घेतला. त्यामुळे आता हा तरण तलाव सर्वसामान्य नागरिकांना खुला करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading