लोकमान्यनगर मध्ये घरबांधणीसाठी योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील लोकमान्य नगर विभागामध्ये ठाणे महापालिकेने क्लस्टरची योजना मंजूर केली असताना एस.आर.ए. प्राधिकरणाने झोपू योजने संदर्भात सुद्धा लोकमान्य नगर मध्ये चाचपणी चालू केल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी पालकमंत्र्यांकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेने या परिसरातील धोकादायक इमारतींचा विचार करता क्लस्टर योजनेलाच सहमति दर्शविल्यामुळे ही भूमिका घेतली होती. परंतु काही स्वार्थी राजकारण्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी धोकादायक इमारतींना वाऱ्यावर सोडून एस.आर.ए. प्राधिकरणाकडे चुकीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिल्यामुळे आता या प्रकरणाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री करणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading