लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये दुचाकी जाळण्याचा लाईव्ह व्हीडीओ समोर आल्यानं खळबळ

ठाण्यामध्ये ९ दुचाकींचं जळीतकांड ताजं असतानाच लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये दुचाकी जाळण्याचा लाईव्ह व्हीडीओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. एका मद्यधुंद माथेफिरूनं मोबाईलवर चित्रीकरण केलं जात असल्याची माहिती असतानाही हे जळीतकांड केलं. दिनेश शिंदे असं दुचाकी जाळणा-या माथेफिरूचं नाव आहे. शिंदे हा पूर्वी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असे. त्यानंतर काही काळ स्थानिक नगरसेवकाच्या गाडीवरही तो चालक होता. त्याने जाळलेली दुचाकी ब्रिजेश यादव यांची आहे सध्या पोलीस दिनेश शिंदेचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading