लसीकरण मोहिमेमध्ये सहकार्य करणाऱ्या व्हॅक्सिनेशन हिरोंचा सन्मान

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा आणि कोलशेत परिसरातील लसीकरण मोहिमेमध्ये सहकार्य करणाऱ्या व्हॅक्सिनेशन हिरोंचा नुकताच सन्मान करण्यात आला. अर्पण फाऊंडेशन आणि आयएनव्हीसीच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यात १०० हून अधिक नागरीकांना गौरविण्यात आले. ठाण्यात सर्वप्रथम खासगीकरणातून लसीकरणाची मोहीम अर्पण फाऊंडेशन आणि आयएनव्हीसीने सुरू केली. या माध्यमातून हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा आणि कोलशेत परिसरातील १५ हजारांहून अधिक नागरीकांचे मोफत आणि सशुल्क पद्धतीने लसीकरण झाले. त्यात परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरीकांचाही समावेश होता. या कार्यात सहकार्य करणाऱ्या १०० हून अधिक नागरीकांचा व्हॅक्सिनेशन हिरो म्हणून सन्मान करण्यात आला. आपत्तीच्या काळात सामान्यांच्या मदतीला अर्पण फाऊंडेशन धावून आली. डोंगरीपाडा गुरुद्वाराच्या माध्यमातून अन्नछत्राच्या माध्यमातून हजारो नागरीकांची भूक भागविली गेली. आयएनव्हीसीमार्फत कोरोनाबरोबरच विविध आजारांवर लस पुरविल्या जातात. आगामी काळात १८ वर्षांखालील मुलांसाठी कोरोनावरील लस दिली जाणार आहे. ठाण्यातील नागरीकांना लवकरात लवकर लस मिळावी, यासाठी अर्पण आणि आयएनव्हीसीकडून पुढाकार घेतला जाईल अशी माहिती मनोहर डुंबरे आणि अमित मोदी यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading