रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि ट्रायंफ रन २०२३ फौंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि ट्रायंफ रन २०२३ फौंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. होली क्रॉस शाळेच्या मैदानावर या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. रोटरीचे जिल्हा प्रांतपाल कैलास जेठानी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यामध्ये ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगर मधील सुमारे ४० विशेष शाळांमधील जवळपास १ हजार मुलांनी सहभाग घेतला होता. यामधअये १०९ कर्णबधीर तर ९०० च्या आसपास गतीमंद मुलं होती. या कार्यक्रमाचं हे २२ वं वर्ष असून वयोगटानुसार मैदानी खेळ आणि स्पर्धा घेण्यात आल्या. मैदानी खेळांबरोबरच टॅटू काढणे, हेअर बिडींग, रायफल शूटिंग अशा कार्यक्रमांचंही आयोजन करम्यात आलं होतं. यावेळी सर्व मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading