रेशनऑफिस आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

नागरिकांना शिधापत्रिकेबाबत असलेल्या समस्या तक्रारी तातडीने दूर करता याव्यात यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने आनंदनगर, कोपरी येथे ‘रेशन ऑफिस आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आनंदनगर कोपरी येथील श्री वाघजाई मंदिर सभा मंडप येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शिधावाटपपत्रिका आधारकार्डला लिंक करणे, शिधापत्रिकेवरील पत्ता बदलणे, शिधावाटपपत्रिकेत नवीन नावांचा समावेश करते. तसेच नाव कमी करणे, दुय्यम शिधापत्रिका देणे आदी कामे करण्यात आली. या उपक्रमाचा फायदा आनंदनगर, गांधीनगर, केदारेश्वरनगर आणि सिध्दीविनायकनगर परिसरातील नागरिकांनी घेतला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading