ठाणे स्थानकाला ए-१ दर्जा प्रथम क्रमांकाची पुरस्काराची ढाल मिळाली आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकात सर्वात गर्दीच स्थानक म्हणून ठाणे स्थानकाची ओळख असली तरी, स्थानकाचे आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न ठाणे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केला जातो. उपनगरीय रेल्वेस्थांकातील मोठ्या रेल्वे स्थानकाच्या पाहणी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. यामध्ये स्वछता, देखभाल, गार्डन आदी सर्व गोष्टींची तपासणी केली गेली मुंबई डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आलेल्या पाहणी परीक्षेत ठाणे स्थानकाला ए-१ दर्जा प्रथम क्रमांकाची पुरस्काराची ढाल मिळाली आहे. मुंबईत झालेल्या एका सोहळ्यात ठाणे रेल्वे मॅनेजर आर. के मीना यांनी हि ढाल स्वीकारली आहे. ठाणेकरांसाठी हि अभिमानाची गोष्ट आहे.