रेल्वेवर दगडफेक, आरोग्य केंद्र संदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याचे रेल्वेचे आश्वासन

दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे आरोग्य केंद्र तसेच रेल्वेवर दगडफेक संदर्भात मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांना निवेदन देण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावर दिवा रेल्वे स्थानकावर रेल्वेचे आरोग्य केंद्र इमर्जन्सी मेडिकल रूम नाही तसेच काही दिवसापासून लोकल तसेच मेल एक्सप्रेस वर दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे सल्लागार कमिटीची बैठक झाली. यावेळी सेंट्रल रेल्वे ठाणे रेल्वे स्थानक सल्लागार कमिटी सदस्य अमोल कदम यांनी दिवा रेल्वे स्थानकातील गैरसोयींबाबत निवेदन दिले. लोकल तसेच मेल एक्सप्रेस गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आरपीएफ, जीआरपी तात्काळ घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन जनजागृती करत आहेत. तसेच दगडफेक करणाऱ्याचा शोध देखील घेत आहेत. पण दगडफेकीचे प्रमाण वाढत असल्याने अशा घटनामुळे प्रवासी जखमी होत असून यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच दिवा स्थानकात आरोग्य केंद्र उभारावे अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर मुंब्रा, डोंबिवली रेल्वे स्थानकावर बंद असलेले वन रुपी क्लिनिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावे, कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानक तेथे जलद लोकलला थांबा देण्यात यावा, कळवा कारशेड लोकल सकाळच्या वेळेत कळवा रेल्वे स्थानकातून सुरू करावी अशा समस्यांचे निवेदन देण्यात आले. याविषयी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क करून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading