घोडबंदर रोडवरील वाहतूकीत  बदल

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात में जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लि. कंपनी कडून मुंबई मेट्रो लाईन-४ चे कासारवडवली ते गायमुख पर्यंत काम चालू असून मेट्रो-४ चे पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने 3 डिसेंबर पर्यंत  वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयूक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

प्रवेश बंद :- मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे “प्रवेश – बंद” करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनाना खारेगाव टोलनाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुर फाटा मार्गे – इच्छित स्थळी जातील.
जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकण्याचे वेळी कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप कट येथून डावीकडे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे नागलाबंदर सिग्नल कट जवळ उजवे बाजूस वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.
1) दि. २८/११/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. २९/११/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत
2) दि. ३०/११/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०१/१२/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत
3) दि. ०२/१२/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा ते दि. ०३ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading