जानेवारीत होणार बंजारा समाजाचे महाकुंभ – ठाण्यात आज पोस्टर प्रकाशन

जानेवारीमध्ये होणा-या अखिल भारतीय हिंदू बंजारा-लबाना नायकडा महाकुंभामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी केले. ठाण्यात या महाकुंभाच्या पोस्टरचे प्रकाशन झाले त्यावेळी पवार यांनी हे आवाहन केलं.
जामनेर तालुक्यातील गोद्री या गावात अखिल भारतीय हिंदू बंजारा – लबाना नायकडा महाकुंभ २०२३ होणार असून देशाच्या इतिहासात बंजारा समाजाचा हा पहिलाच महाकुंभ होणार आहे. या कुंभचे प्रमुख निमंत्रक पोहरादेवी संस्थानचे संत बाबुसिंग महाराज आहेत. महाकुंभमध्ये देशभरातील १०० हुन अधिक साधू, संत, महंत येणार असून देशभरातील १२ लाख हुन अधिक बंजारा समाजाचे नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक समीतिमधील आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी दिली. या कुंभमध्ये बंजारा समाजाच्या परंपरा, इतिहास, संस्कृति, गीत,खेळ, पोशाख, रीतिरिवाज अशी सिंधु संस्कृतीपासून आलेल्या माहिती या कार्यक्रमांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गोवा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यातील जवळपास १२ लाख लोक कुंभासाठी येणार आहेत. बंजारा समाजात ख्रिश्चन मिशनरीकडून आक्रमण सुरु असून आता यांना थांबविण्याची वेळ आली आहे. ही विकृती समाजाला वाळवीसारखी पोखरत आहे. त्यामुळे बंजारा समाजाच्या नागरिकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि वेळ आल्यास धर्मांतर करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading