रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका युवतीची फसवणूक

रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका युवतीची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वागळे पोलीसांनी संजय भोसले आणि ज्योत्स्ना साळसकर यांना अटक केली आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी वागळे इस्टेट येथील या युवतीनं कल्याणच्या भोसले ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. तिथेच संजय भोसले यांनी या युवतीला रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस म्हणून नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं होतं. यापोटी भोसलेनं या युवतीकडून ४ लाखांचा धनादेश घेऊन तो ज्योत्स्ना साळसकर यांच्या नावे वटवला. पैसे दिल्यानंतर वारंवार मागणी करूनही या तरूणीला नोकरी किंवा पैसे मिळाले नाहीत. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर तिने पोलीसांकडे याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading