कोविड महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचारी, सरकारी कार्यालयातील विविध आस्थापनांनी काम केले आहे. या सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स फाऊंडेशन, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट पॉईंट यांच्या वतीने मास्क तयार करण्यात आले आहेत. या मास्कचे वाटप महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेतील कर्मचाऱ्यांना करण्यात आले. आजपर्यत एकूण 5 हजार 100 मास्कचे वाटप रिलायन्सच्या वतीने करण्यात आले.