राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात

राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात झाली. जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार नवीन मतदार नोंदवले गेले असून ठाणे जिल्हा मतदार नोंदणीत राज्यात पहिला आला आहे. जिल्ह्यामध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० हजार २२९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यानंतर मुरबाडमध्ये ३७ हजार १६७, ऐरोलीमध्ये २० हजार १६२, कळवा-मुंब्र्यामध्ये १८ हजार ५९७, मीरा-भाईंदर २२ हजार ७१४, भिवंडी ग्रामीणमध्ये १८ हजार ६९५, शहापूरमध्ये १३ हजार २०१, भिवंडी पश्चिमेत १९ हजार ४११, भिवंडी पूर्वेत १४ हजार ९५०, कल्याण पश्चिमेत ३३ हजार ९६७, अंबरनाथमध्ये १७ हजार १३२, कल्याण पूर्वेत १७ हजार १९९, डोंबिवलीत १० हजार ७०३, ओवळा-माजिवडामध्ये २१ हजार ३०३, उल्हासनगरमध्ये १० हजार १३०, ठाण्यामध्ये १७ हजार ४३० तर सर्वात कमी म्हणजे ७ हजार ७६३ मतदारांची नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading