राष्ट्रीय मतदानाच्या कार्यक्रमात ठाण्यातील नव मतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ

राष्ट्रीय मतदानाच्या कार्यक्रमात ठाण्यातील नव मतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली. जिल्हा निवडणूक विभागातर्फे युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी शपथ दिली. युवा मतदारांनी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी होण्यासाठी निबंध, वक्तृत्व, रांगोळी अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. मतदार नोंदणीत उल्लेखनीय काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. सक्षम लोकशाहीसाठी आपण आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असं सांगून युवा पिढीनं सोशल मिडीयापासून दूर रहा असं आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव मंगेश देशपांडे यांनी केलं. यावेळी बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी पथनाट्य सादर केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading