राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी जिल्हास्तरावर २६३ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून तालुका पातळीवर एकूण ४२४ प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे गेली एकतीस वर्षे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित केली जाते. शालेय विद्यार्थ्यांत मुलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी संशोधनाकडे वळावे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या वर्षीची परिषद २७ ते ३१ डिसेंबर या दरम्यान संपन्न होणार आहे. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेस प्रत्येक राज्यातील निवडक बाल वैज्ञानिक सहभागी होऊ शकतात. जिज्ञासा ट्रस्ट ठाणे हि संस्था सन २००० पासून महाराष्ट्र राज्यात बाल विज्ञान परिषदेचे संघटक म्हणून कार्य करत आहे.या वर्षीचा मुख्य विषय “आरोग्य आणि स्वास्थासाठी परिसंस्था समजून घेणे”आहे. यशस्वी चंद्रयान मोहिमेच्या पाश्व्भुमीवर या वर्षी जिल्ह्यातून तालुका पातळीवर एकूण ४२४ प्रकल्पांची विक्रमी नोंदणी झाली. यात ठाणे, डोंबिवली, कल्याण, शहापूर, मुरबाड आणि नवी मुंबई महानगर पालिका शाळा, या शाळांचा हि समावेश होता. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे, नवी मुंबई म.न.पा.चाय शाळन मधील ७५ प्रकल्पांची जिल्हा स्तरीय निवड झाली आहे. या बाल वैज्ञानिकानी सादर केलेल्या त्यांच्या संशोधन प्रकल्पाच्या आराखड्याच्या आधारे ठाणे जिल्हास्तरीय परिषदेसाठी २६३ प्रकल्पांची निवड झाली आहे. या मध्ये इंग्लिश , मराठी , तसेच हिन्दी माध्यमाच्या शाळांचा सहभाग आहे. अल हसंत यांग्लो उर्दू स्कूल 2, डॉ. बेडेकर विद्यालय 4, हॉली क्रॉस कॉन्वेट हायस्कूल २ , चंद्रकांत पाटकर विद्यालय ४ , लोकपूरम पब्लिक स्कूल २ , एम ई स क्रीसेंट इंग्लिश स्कूल ७ , नवोदय इंग्लिश हायस्कूल ३ , नवी मुंबई महानगरपालिका मधील वेगवेगळया शाळेतील ७५ , सरस्वती विद्यालय , घोडबंदर रोड, – १० , सरस्वती सेकंडरी स्कूल मराठी माध्यम १३ , श्रीरंग विद्यालय इंग्लिश स्कूल ११ , श्री हरिक्रिशन इंग्लिश स्कूल ३, श्री के कोतकर विद्यामंदिर डोंबिवली १७, श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर २, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ४७ , श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया स्कूल २७, सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्लिश स्कूल ६ , सौ. ए. के. जोशी इंग्लिश मि. स्कूल ५, सेंट लॉरेन्स हायस्कूल १९ , ठाणे महानगरपालिका शाळा नं ११२ – १ , सिग्नल शाळा १ अशा शाळांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषद १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. या परिषदेत बाल विद्यार्थ्यांना आपण निवडलेल्या विषया वर 1500 ते 2000 शब्दात लिहिलेला संशोधन प्रकल्प, 4 तक्याच्या माध्यमातून ६ मिनिटात परीक्षकांसमोर सादर करावयाचा आहे. जिल्हा स्तरावरून निवडलेले प्रकल्प राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवडले जातील असं राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी
सांगितलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading