ठाणे लोकसभा मतदार संघात अडीच लाख ओळख न पटलेल्या मतदारांची दुबार तपासणी करावी – राजन विचारे

ठाणे लोकसभा मतदार संघात अडीच लाख ओळख न पटलेल्या मतदारांची दुबार तपासणी करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नुकताच १४८ ठाणे शहर विधानसभा मतदार संघाची जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी १४८ ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील ओळख न पटलेल्या किंवा वास्तव्य पत्यावर न सापडलेल्या १ लाख २५ हजार मतदारांची नावे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे सोपविली असून त्यामध्ये ठाणे शहर विधानसभा या मतदार संघातील १ लाख २५ हजार मतदारांचा अधिक उच्चांक गाठला आहे. ही बाब खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख आणि १४८ ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये २५ ठाणे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघापैकी एका विधानसभा क्षेत्रात जर १ लाख २५ हजार मतदार ओळख न पटणारे किंवा स्थलांतर झालेले असतील तर ५ विधानसभा क्षेत्रात किती असू शकतील. त्यामुळे हा मतदार यादीतील घोळ अत्यंत संशयास्पद असल्याचे कळविण्यात आलेले आहे. हि नावे मतदार यादीमध्ये ठेवण्यासाठी काही राजकीय शक्ती क्रियाशील असल्याचा संशय सुद्धा या पत्रामध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये ओळख न पटणारे जेवढे मतदार आहेत त्यांची शहानिशा अत्यंत पारदर्शक पद्धतीने दुबार तपासणी करावी जेणेकरून मतदार यादीत नावे ठेवायची कि वगळायची याबाबत निर्णय घ्यावा. अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading