राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत येत्या रविवारी लसीकरण मोहिम

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महापालिकेच्या वतीने येत्या रविवारी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांनी ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन महापालिकेनं केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येय निर्धारीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्याने पल्स पोलिओ विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येते. गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबविली आहे. या मोहिमेस सर्व स्तरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. रविवार २६ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या वतीने विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेतंर्गत ५ वर्षापर्यंतचे एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे विविध ठिकाणी बुथवर आणि त्यानंतर पुढील पाच दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading