खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्वेस दोन नवीन सरकते जिने

ठाणे रेल्वे स्थानकाच्या कोपरी दिशेस दोन नवीन सरकते जिने आज पासून सुरू करण्यात आले आहेत. याचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांच्या हस्ते झालं.
ठाणे रेल्वे स्थानकात नागरिकांच्या सोयीसाठी आत्तापर्यंत 8 सरकते जिने सुरू करण्यात आलेले आहेत व 4 लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहेत. कल्याण व मुंबई दिशेस दोन नवीन पादचारी पुलाचे काम सुरू असून या पुलाच्या कामाला गती मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
आज सुरू करण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या कामास 2019 ला मंजुरी मिळाली असून याचे काम सप्टेंबर 2020 मध्ये सुरू करून मार्च 2021 पर्यंत काम पूर्ण करण्यात आले होते. परंतु कोव्हीड-१९ मुळे रेल्वे मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे सर्व पादचारी पूल बंद असल्याने याचे काम सुरू होण्यास विलंब लागत होता. वारंवार पाठपुरावा करून आज सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत. या सरकत्या जिन्यासाठी 1कोटी 80 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading