राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मानके आणि उत्पादन या विषयावर प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना देण्यात आलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे. यासाठी मानके आणि उत्पादनांचे या विषयावर प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा यासाठी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्राहक हा ‘राजा’ होऊ शकेल. कोणतीही वस्तू आपण खरेदी केली तर ती भारतीय मानक आहे की नाही हे तपासून घ्यावे. सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टिने आपण सर्वानी जागरुक राहिले पाहिजे. भारतीय मानका बदल जागरुकता असली पाहिले असे यावेळी ठाणे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय पाटील यांनी नमुद केले. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळतो. सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क,तक्रार आणि निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहकांना मदत,या विषयावर माहीती दिली. ग्राहकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींबाबत हेल्पलाइनवरुन मार्गदर्शन करण्यात येते. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असतील त्याबाबत कुठे तक्रार करावी त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे याची सर्व माहिती ब्युरो ऑफ इंडियन स्टॅडर्डचे तुषार शर्मा यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading