ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या नवीन बसेस दाखल होणार

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन वर्षात इलेक्ट्रीक आणि सीएनजीच्या २० नवीन बसेस दाखल होणार आहेत. परिवहन समितीच्या बैठकीत यावर चर्चा करून शिक्कामोर्तब करण्यात आला. ठाणे परिवहन सेवेच्या १५३ बसेस भंगारात पडून होत्या. या बसेसचा लिलाव करून परिवहनला ५ कोटी ८२ लाख रूपये इतकी रक्कम मिळाली होती. त्यातून परिवहनने २० सीएनजी बसेस घेण्याचं ठरवलं आहे. तर केंद्र सरकारच्या अनुदानातून इलेक्ट्रीक बस घेण्यात येणार आहेत. या दोन्ही बसेस लक्षात येण्यासाठी इलेक्ट्रीक बसेससाठी हिरव्या रंगाचा पट्टा तर सीएनजी बसेससाठी हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा पट्टा ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading