राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड विजयी

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच या मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला होता. शिवसेनेला या मतदारसंघात योग्य उमेदवारच सापडत नव्हता. त्यामुळे अखेर अभिनेत्री दिपाली सय्यद यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तुलनेनं नवख्या असलेल्या दिपाली सय्यद यांनीही या मतदारसंघात चांगली लढत दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading