गणपत गायकवाड यांचा ८ हजार १९५ मतांनी विजय

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणपत गायकवाड यांनी ८ हजार १९५ मतांनी विजय मिळवला आहे. गणपत गायकवाड यांना ५२ हजार ९१८ तर धनंजय बोडारे यांना ४४ हजार ७२३ मतं मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेली होती. त्यामुळं या मतदारसंघात बंडखोरी झाली होती. शिवसेनेच्या धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी शेवटपर्यंत आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे गायकवाड यांना आव्हान निर्माण झालं होतं. मात्र गायकवाड यांनी निवडणूक जिंकून बोडारे यांना पराभवाची धूळ चारली. या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रकाश तरे यांनी १४ हजार ८६१ मतं घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या अश्विनी थोरात-धुमाळ यांना १२ हजार ५५६ मतं मिळाली. तर ३ हजार ५६३ मतदारांनी नोटाचा हक्क बजावला. एकूणच मतं विभाजनामुळे गणपत गायकवाड यांचा विजय सुकर झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading