रामनगर मधून एका मगरीच्या पिल्लाची सुटका

वागळे इस्टेट येथील रामनगर मधून एका मगरीच्या पिल्लाची सुटका करण्यात आली आहे. रामनगर मधील एका छोट्याश्या डबक्यात नुकतीच अंड्यातून ही मगर बाहेर पडत होती. पुनर्वसु फौंडेशनच्या सदस्यांनी तिची सुटका केली. त्यानंतर मगरीचं हे छोटं पिल्लू वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनकडे पुनर्वसनासाठी सोपवण्यात आलं. मगरीचं हे छोटं पिल्लू साधारणत: १ फूट लांबीचं असून वजनाला १०० ग्रॅम होतं. दोन वर्षापूर्वी म्हणजे जुलै २०१९ मध्ये याच भागातून अशाच मगरीच्या पिल्लाची सुटका करण्यात आली होती. त्यामुळं पुनर्वसु फौंडेशनचे सदस्य आणखी काही मगरीची पिल्लं मिळतायत का याचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading