राबोडी पोलिसांच्या दक्षतेमुळे एका युवाकाचा वाचला जीव

राबोडी पोलिसांच्या दक्षतेमुळे एका युवाकाचा जीव वाचू शकला. पोलिस नियंत्रन कक्षातून रात्रपाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना त्यांना दूरध्वनी आला. राबोडीतील अग्रसेन टॉवर, रूम नं ५०४ मध्ये राहणारा विबोध जाधव हा युवक आत्महत्या करत असल्याची माहीती देण्यात आली. या माहितीनुसार पोलिस तेथे गेले असता विबोध हा आतून कडी लावून घरातील पंख्याला फास लावून घेत होता. तेवढ्यात त्या ठिकाणी पोहचलेल्या अमलदारांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडे विचारपूस करून त्यांच्याकडून फ्लॅटची चावी घेऊन लगेच दार उघडले असता विबोध हा पंख्याला फास लावून घेत होता. लगेच त्याला खाली घेऊन त्याच्या गळ्यातील दोरी काढून त्याच्या वडिलांना माहिती देण्यात आली. वडील लगेच आले. त्यानंतर घडलेला प्रकार त्यांना सांगून विबोधला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारा एक उच्च शिक्षित मुलगा आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. राबोडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या मुलाला सुखरूप वाचवले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading