राबोडी परिसरात झालेल्या स्फोटामुळे गूढ

ठाण्यातील राबोडी परिसरात आज झालेल्या स्फोटामुळे गूढ निर्माण झालं आहे. राबोडीतील के व्हीला शाळेजवळ करिष्मा सोसायटीच्या बाजूला देवदीप ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत पहिल्या माळ्यावर असणा-या फ्लॅट क्रमांक १०४ मध्ये हा स्फोट झाला. सकाळी ८ च्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे गूढ निर्माण झालं आहे. या स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि घरातील भिंती पडल्या. या ठिकाणी अग्निशमन दल, पोलीस आणि बॉम्ब शोधनाशक पथकानं धाव घेतली. सुदैवानं या स्फोटामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ही जागा डेव्हीड सरोसे यांची आहे. स्फोट झालेल्या खोलीत धूम्रपानास मनाई आहे असा फलक लावण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे घरामध्ये अशी सूचना कोणी लावत नाही. यामुळं एकूणच या स्फोटामुळे गूढ निर्माण झालं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading