जिल्हयात 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहिम

क्षयरोग – कुष्ठरोग या एक गंभीर सामाजिक आरोग्य समस्या असून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हयात संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध मोहिमे अंतर्गत जनजागृती अभियान 1 ते 16 डिसेंबर या कालावधी दरम्यान राबविण्यात येणार आहे. जिल्हयात एकूण 2 हजार 145 सर्वेक्षण टीम द्वारे घरोघरी जाऊन क्षयरोग – कुष्ठरोग जनजागृती करुन
कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करुन रोगांच्या लक्षणांची माहिती देण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील आणि
ग्रामीण भागातील एकूण 19 लाख 78 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे. तसेच रोगांची लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्सरे, थुंकी तपासणी, सिबिनॅट तपास जवळच्या सरकारी दवाखान्यात करुन रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण-कुष्ठरुग्ण शोध अभियान या मोहिमेत आढळणाऱ्या संशयीत क्षयरुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या शोध मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांचे गट करुन घरोघरी जावून भेटी देणार असून क्षयरोग- कुष्ठरोग संबंधित पुर्ण माहिती आणि योग्य मार्गदर्शन देतील. तपासणीत जंतूचा प्रादुर्भाव आढळल्यास अशा रुग्णांना त्वरित मोफत उपचार करण्यात येईल, तरी या मोहिमेमध्ये जनतेने सक्रिय सहभाग घेऊन संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वी करण्यास सहकार्यकरावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिका-यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading