राबोडीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटीमार्गावर प्रायोगिक तत्वावर सम विषम पार्किंग

राबोडी वाहतूक उपविभाग हद्दीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटी मार्गावर सम -विषम तारखेला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था प्रायोगिक तत्वावर पुढील 15 दिवस असणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

सरस्वती विद्यालय गेट नं. 2 ते पंचगंगा सोसायटी लगत रस्त्यावर दोन्ही बाजूस सदर परिसरातील रहिवासी, दुकानदार व ग्राहक हे त्यांची वाहने पार्क करीत असल्याने सदर परिसरात दैनंदिन वाहतूक कोंडी होत असते. सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होवू नये, वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी खालील ठिकाणी पी-1 व पी-2 पार्किंग व्यवस्था राबविण्यात येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. राठोड यांनी दिली आहे.

पी-1 पार्किंगचे ठिकाण :-  राबोडी सरस्वती विद्यालय गेट नं. 2 ते पंचगंगा सोसायटी, राबोडी येथे 300 मीटर परिसरात पी-1 पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पी-2 पार्किंगचे ठिकाण :-  पंचगंगा सोसायटी राबोडी ते राबोडी सरस्वती विद्यालय गेट नं. 2 येथे येथे 300 मीटर परिसरात पी-2 पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading