राबोडीतील एका दुकानात लागलेल्या आगीत दोघेजण किरकोळ जखमी

राबोडी येथे एका दुकानात आज संध्याकाळच्या सुमारास गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागली होती. यामध्ये दोघेजण भाजले असून त्यांना खोपट येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राबोडीतील आकाशगंगा कॉम्प्लेक्स येथील चित्रा विशाखा या तळ अधिक ७ मजली इमारतीत तळमजल्यावर साईनाथ भेळपुरी सेंटर हे दुकान आहे. या दुकानात आज संध्याकाळच्या सुमारास एचपी कंपनीचा गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागली होती. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये या दुकानातील राजपत यादव आणि रतनदेवी यादव हे दोघेजण भाजले असून त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत आग लागून दुकानातील इलेक्ट्रिक वस्तूंचे आणि खाद्यपदार्थांचे जळून नुकसान झाले आहे. लिकेज गॅस सिलेंडर सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलातील जवानांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading