पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर मेडल पटकवणारे खेळाडू पैशांअभावी राहत आहेत मागे

केरळ येथे झालेल्या इंटरनॅशनल एशियन पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताला दोन गोल्ड मेडल तर दोन सिल्वर मेडल आणि एक स्ट्रॉंग मॅन चा किताब प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू ठाण्यातील आहेत. कोपरी परिसरातील द युनायटेड स्पोर्ट्स क्लब येथील व्यायाम शाळेत सराव करणाऱ्या चाळके फिट अँड फाईन मधील राजेश शेटे आणि समृद्धी देवळेकर यांना गोल्ड मेडल तर धर्मेंद्र यादव आणि जितेंद्र यादव या दोघांनी सिल्वर मेडल पटकावले आहे. यामध्ये जितेंद्र यादव हा एशियन स्ट्रॉंग मॅनचा देखील मानकरी ठरला आहे. हे सर्व खेळाडू मध्यम वर्गीय असून अनेक प्रसंगांवर मात करत ते इंटरनॅशनल एशिया स्पर्धेमध्ये पोहोचले आहेत, पुढे परदेशात होणाऱ्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जाण्याकरीता त्यांचा मानस आहे. पैशांअभावी खेळ मागे राहत आहे. अनेकांकडे मदतीचा हात पुढे केल्यानंतर त्यातील काही जण मदत करतात. परंतु काही काचकुच करतात. मुख्यमंत्री ठाण्याचेच असल्याने मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत अशा भावना यावेळी या खेळाडूंनी व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading