चिमणी संवर्धनासाठी ठाण्यातील बच्चेकंपनी सरसावली

चिमणी संवर्धनासाठी ठाण्यातील बच्चेकंपनी सरसावली आहे. ठाणे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि चरई परिसरातील गणेश निवास इमारतीच्या
आवारात चिमण्यांची घरटी लावण्यात आली त्याच बरोबर पक्ष्यांना धान्य देण्यासाठी नारळाच्या करवंटी पासून बनविण्यात आलेले फीडर ही
लावण्यात आले यावेळी सोसायटीच्या बालगोपालांनी उपस्थित राहत चिमण्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. तर ठाणे नॅचरल हिस्टरी सोसायटी चे
कौस्तुभ दरवेस, अनिकेत सोनवणे, आदींनी मुलांना चिमण्यांच्या संगोपनात आलेले आपले अनुभव मुलांना सांगत चिमणी संवर्धनाविषयी त्यांच्या प्रश्नना उत्तरे दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading