एका चार चाकी वाहनानं दिलेल्या धडकेत पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी जखमी

एका चार चाकी वाहनानं दिलेल्या धडकेत पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी हा प्रकार घडला. पोलीस मुख्यालयातील अंमलदार लक्ष्मण गायकवाड आणि परवाना शाखेचे वरिष्ठ लिपीक सुरेश घोळवे हे यामध्ये जखमी झाले आहेत. साकेत मैदानात सध्या पोलीस भरती सुरू असून पोलीस भरती बंदोबस्त पूर्ण झाल्यावर हे दोघे दुचाकीवरून परत येत असताना मागून येणा-या चारचाकीनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading