कोरोना व्हायरसचा प्रसार थांबावा यासाठी राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील कोचिंग क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोचिंग क्लास आणि शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिळालेली ही सुट्टी कुठेही बाहेर सहल किंवा इतरत्र फिरण्यासाठी नाही तर या कोरोना व्हायरस पासून आपला बचाव व्हावा यासाठी असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.