टोरंटच्या कर्मचा-याला स्थानिकांकडून धमकी

जिल्ह्यातील मुंब्रा, शिळ आणि कळवा या भागासाठी टोरंट या फ्रॅन्चायझीची नेमणूक करण्यात आली आहे.यावरून काही स्थानिकांकडून टोरंटच्या कामात खोडा घालण्याचे काम सुरु आहे. टोरंटचे कर्मचारी दिवा परिसरात वीज बिले वाटप करीत असताना नितेश किणे याने कमर्चाऱ्यांना धमकावत मारहाण करून कागदपत्रे फाडली होती. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी किणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने किणे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. टोरंटने दिवा भागात कार्यभार स्वीकारून काम सुरु केल्यानंतर काही समाजकंटकांकडून टोरेंट पावरची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणुनबुजुन वीज वितरणाच्या नेटवर्कशी छेडछाड करून विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. 13 मार्चला टोरेंट पावर कंपनीचे कर्मचारी दिवा परीसरात वीजबील वाटपाचे काम करीत असताना दिव्यातील एनआर नगर येथे नितेश कीणे यांच्याकडुन वीजेची बिले वाटण्यास मज्जाव करून कागदपत्रे फाडण्यात आली. तसेच शिवीगाळ करीत बिल्डिंग नं 2 मधील संजय म्हात्रे यांच्या कार्यालयात नेऊन टोरेंटच्या कर्मचा-यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्याचबरोबर टोरंटच्या कर्मचा-यांकडील मोबाईल आणि ईतर ऐवज हिसकावून टोरेंट पावरचे कामकाज केल्यास हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading