राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ठाण्याच्या सुश्मिता देशमुखने मिळवले सुवर्णपदक

प्रभादेवी येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग क्लासिक सब जूनियर, जूनियर, सीनियर, मास्टर स्पर्धेत सुस्मिता देशमुखने सुवर्णपदक पटकावले. कामगार क्रीडा भवन कल्याण मंडळ येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुस्मिताला सीनियर गटामध्ये 52 किलो वजनी गटात 332.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक आणि स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र 2022 हा किताब मिळाला. या स्पर्धेसाठी राज्याच्या विविध भागातून 500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कल्याणच्या कारभारी जिम मध्ये विनायक कारभारी यांच्या कडे सुस्मिता सराव करते. या यशाचे श्रेय तीने आई वडील आणि कारभारी जिमचे टीम सहकारी निलेश भोईर, सिद्धार्थ तारे, प्रथमेश भालेकर,निलेश देशमुख यांना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading