राजेश मढवी फाऊंडेशन तर्फे मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णांना दिवाळी फराळाची अनोखी भेट.

दीपावलीच्या धनतेरस दिवसाचे औचित्य साधून राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने मेंटल हॉस्पिटल मधील मनोरुग्ण बांधवांसोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळीनिमित्त ११०० मनोरुग्ण बांधवांना, रुग्ण मित्रांना दिवाळीच्या चकली, लाडू, चिवडा असा फराळ देण्यात आला. या कार्यक्रमात मनोरुग्णांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्यासाठी आणखीन काही योजना राबविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. हे मनोरुग्ण नसून मने हरवलेली आपल्यासारखीच माणसे आहेत जी उपचार आणि मायेने परत पुर्वस्थितीत येतील असे मनोगत राजेश मढवी यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading