राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात यशस्वी तडजोड केल्याबद्दल डॉक्टरांनी महापौरांचे मानले आभार

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात यशस्वी तडजोड केल्याबद्दल महापौरांचे डॉक्टरांनी आभार मानले आहेत.राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात शासननिर्णयानुसार वाढ करावी, तसेच त्यांच्या इतर प्रलंबित असलेल्या मागण्या महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनासोबत बैठक घेवून तातडीने दूर करुन या निवासी डॉक्टरांना दिलासा दिला होता. याबद्दल निवासी डॉक्टरांनी महापौरांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे आभार मानले. कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी डॉक्टर काम करीत आहेत. या निवासी डॉक्टरांनी त्यांच्या मागण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने हे सर्व निवासी डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत होते. कोविड काळात डॉक्टरांनी संपावर जाणे योग्य नसल्याने महापौर नरेश म्हस्के यांनी निवासी डॉक्टरांशी चर्चा करुन तात्काळ प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात शासन निर्णयानुसार 10 हजारांची वाढ त्यांच्या मासिक वेतनात करावी आणि फरकाची रक्कम देखील अदा करावी. तसेच त्यांच्या हॉस्टेलची डागडुजी करावी. कँटीनमध्ये जेवणाची चांगली व्यवस्था व्हावी आदी सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या. प्रशासनाने देखील निवासी डॉक्टरांच्या मासिक वेतनात शासननिर्णयानुसार 10 हजारांची वाढ त्यांच्या वेतनात दिली. तसेच इतर प्रलंबित मागण्याबाबत प्रशासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading