राजन विचारे यांना सव्वा लाखाहून अधिक आघाडी मिळताच शिवसैनिकांचा जोरदार जल्लोष

ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांना सव्वा लाखाहून अधिकची आघाडी मिळताच शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. निवडणूक मतमोजणी ठिकाणाच्या बाहेर पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि नवनिर्वाचित खासदार राजन विचारे यांना उचलून शिवसेना प्रमुखांचा जयजयकार करण्यात आला.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख २५ हजार ९६६ मतांची आघाडी मिळाली आहे. २ वाजून २५ मिनिटांनी हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना २ लाख ५२ तर आनंद परांजपे यांना ७४ हजार ८६ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना १ लाख ६९ हजार ५८६ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख ३६ हजार १२७ तर बाबाजी पाटील यांना ६६ हजार ५४१ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ४४ हजार
३६९ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना १ लाख ७७ हजार ९१७ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना १ लाख ३३ हजार ५४८ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८४ हजार ७६० मतांनी आघाडीवर आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ५८ हजार ८३७ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ७४ हजार ७७ मतं मिळाली आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading