विचारे-गावित यांची आघाडी वाढली

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख ४० हजार ३०३ मतांची आघाडी मिळाली आहे. २ वाजून ४० मिनिटांनी हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना २ लाख २२ हजार २६२ तर आनंद परांजपे यांना ८१ हजार ९५९ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८५ हजार १४२ मतांनी आघाडीवर आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ६६ हजार ३०३ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ८१ हजार १६१ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading