जिल्ह्याचा युतीला कौल

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना १ लाख १४ हजार ३७० मतांची आघाडी मिळाली आहे. २ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना १ लाख ८२ हजार ३८० तर आनंद परांजपे यांना ६८ हजार १० मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना १ लाख ५३ हजार ५०१ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना २ लाख १६ हजार ८९६ तर बाबाजी पाटील यांना ६३ हजार ३९५ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ४४ हजार
३६९ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना १ लाख ७७ हजार ९१७ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना १ लाख ३३ हजार ५४८ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८४ हजार ६५५ मतांनी आघाडीवर आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ४८ हजार ८१९ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ६४ हजार १६४ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading