रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणी कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी खड्डे भरणीचे काम तातडीने सुरू आहे. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आनंदनगर चेक नाका येथील रस्ता दुरुस्ती, खड्डे भरणी कामाची पाहणी करून ही कामे दर्जेदार करण्याच्या कडक सूचना एमएमआरडी एचे अधिकारी आणि ठेकेदारास दिल्या. महापालिका आयुक्त सातत्याने याचा आढावा घेत असून ते स्वत: रस्त्यांच्या कामाची पाहणी करीत आहेत. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत खड्डे भरण्याची कार्यवाही सुरु आहे. आनंदनगर चेक नाका येथील मुंबईकडे जाणाऱ्या हायवेवरील खड्ड्याची पाहणी आयुक्तांनी केली. या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम एमएमआरडीएकडे असून सध्यस्थितीत सुरु असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत दर्जेदार कामे करण्याच्या कडक सूचना संबधितांना दिल्या. यामध्ये पेव्हर ब्लॉकचे सुरु असलेले काम दर्जेदार करून रस्त्याची लेव्हल करणे, खड्डे बुचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading