रस्ता रूंदीकरणात तोडल्या जाणा-या वृक्षांचं आता पालिका करणार पुनर्रोपण

ठाण्यामध्ये रस्ता रूंदीकरणात तोडल्या जाणा-या वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे. ठाणे महापालिकेनं मोठ्या वृक्षांचं पुनर्रोपण करणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी केली असून आता या यंत्राच्या माध्यमातून बाधित झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या यंत्राच्या माध्यमातून काल पडले येथे विकास प्रस्ताव रस्त्याच्या कामात अडसर ठरत असलेल्या झाडांचे इतरत्र पुनर्रोपण करण्यात आले. या यंत्राची ४० फूटापर्यंतच्या झाडाची पुनर्रोपण करण्याची क्षमता आहे. या यंत्राच्या सहाय्यानं झाड मुळासकट अलगद उचललं जातं. त्यामुळं झाडाला कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. या यंत्रामुळे उचललेलं झाड पुन्हा दुस-या ठिकाणी लावण्याची प्रक्रियाही सहज होत असून यामुळं वेळेचीही बचत होणार आहे. रस्ता रूंदीकरणात अडथळा ठरणारी झाडं न तोडता त्याचं इतरत्र पुनर्रोपण करणं या यंत्रामुळे शक्य झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading