रविवारच्या बोस्टन मॅरेथॉनमध्ये ठाण्यातून डॉ. महेश बेडेकरांसह २८ स्पर्धक व्हर्च्युअली होणार सहभागी

जगातील सर्वात कठीण समजली जाणारी बोस्टन मॅरेथॉन १० ऑक्टोबरला ठाण्यात व्हर्च्युअल पध्दतीनं होणार आहे. सध्या सर्वत्र कोरोना असल्यामुळं व्हर्च्युअल पध्दतीनं ही मॅरेथॉन होणार असून ठाण्यातील सुप्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. महेश बेडेकर यांच्यासह २८ जणांचा एक चमू या मॅरेथॉनमध्ये व्हर्च्युअल पध्दतीनं सहभागी होणार आहे. यंदाची बोस्टन मॅरेथॉन ही १२५वी मॅरेथॉन आहे. अमेरिकेमध्ये जवळपास २० हजार स्पर्धक या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. कोरोनामुळे परदेश प्रवासावर निर्बंध असल्यामुळे जगातील स्पर्धकांना आपापल्या शहरात धावण्याचं आवाहन करण्यात आलं असून यासाठी एक ॲप या धावपटूंना देण्यात आलं आहे. या ॲपवरून जीपीएस द्वारे स्पर्धकांची सर्व माहिती गोळा केली जाणार आहे. व्हर्च्युअली सहभागी होणा-या स्पर्धकांना ८, ९ किंवा १० ऑक्टोबरला कोणत्याही एका दिवशी सहभागी होता येणार आहे. त्यामुळं ठाण्यातील धावपटू येत्या रविवारी म्हणजे १० तारखेला व्हर्च्युअल बोस्टन मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहेत. ही व्हर्च्युअल मॅरेथॉन हिरानंदानी पासून पहाटे साडेतीन वाजता सुरू होणार असून तिथेच ही स्पर्धा संपणार आहे. डॉ. महेश बेडेकर यांच्याबरोबर २८ हौशी धावपटू या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहेत. गेले चार महिने कोरोनाच्या वातावरणातही या धावपटूंचा सराव सुरू आहे. डॉ. महेश बेडेकर हे बर्लिन, न्यूयॉर्क, लंडन आणि टोकियो आणि शिकागो या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते. कोरोना काळात देशभर न थकता लसीकरण करणा-या नर्सेसना ही व्हर्च्युअल मॅरेथॉन समर्पित करण्यात आल्याचं डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading