ठाण्यातील ठेकेदारांचं देयकं न मिळाल्याच्या विरोधात आज साखळी उपोषण

ठाण्यातील ठेकेदारांनी सुमारे ८०० कोटी रूपयांहून अधिकची देयकं न मिळाल्याच्या विरोधात आज साखळी उपोषण केलं. ठाणे महापालिकेमध्ये जवळपास ४०० ठेकेदार आहेत. हे ठेकेदार ठाणे महापालिकेची रस्ता दुरूस्तीपासून, मलनिस्सारण, पाणी पुरवठा, इमारत बांधणीपर्यंतची विविध कामं करतात. या ठेकेदारांची जवळपास २ वर्षापासूनची ही थकीत देयकं आहेत. कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळं महापालिका देयकं वेळेवर देऊ शकत नाही. यामुळं ठेकेदारांचंही गणित कोलमडलं आहे. त्यांच्याकडील कर्मचा-यांची उपासमार होत आहे. या प्रकरणी देयकं मिळत नसल्यामुळे ठेकेदारांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं. त्यानंतरही काहीच हालचाल न झाल्यामुळे ठेकेदारांनी निदर्शनं केली. पण तरीही कोणताही फरक न पडल्यामुळे ठेकेदारांनी आज या विरोधात साखळी उपोषण केलं. आमच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत आणि कामाप्रमाणेच देयके देण्याचीही जबाबदारी जाणून घ्या अशा आशयाचे फलक घेऊन महापालिका मुख्यालयासमोर या ठेकेदारांनी साखळी उपोषण केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading