ठामपा अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचा-यांना देय असलेला सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान केली. या निर्णयाचा फायदा ठाणे महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचा-यांना होणार असून याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी शिंदे यांचे आभार मानले. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावी अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून होत होती. या संदर्भात अनेक अधिकारी कर्मचा-यांनी महापौरांची प्रत्यक्ष भेट घेवून सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार महापौरांनी प्रशासनासोबत चर्चा करुन याबाबत नगरविकास विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी कोविड कालावधीत ठाणे महापालिका/ कर्मचा-यांनी केलेल्या कामाची दखल घेवून सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. राज्यातील सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग यापूर्वीच लागू झाला होता. आज ठाणे महापालिका अधिकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading