रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – सुधीर मुनगुंटीवार

महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैव विविधता संवर्धन प्रतिष्ठानचे केंद्र प्राणीशास्त्र, पर्यावरण शास्त्राचे एक अभ्यास केंद्र होईल त्याचप्रमाणे मनोरंजन केंद्र आणि शिक्षण केंद्र अशा दोन्ही बाबतीत महत्वाचे केंद्र ठरेल तसंच रंगीत माशांच्या उबवणी केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वन विभाग, कांदळवन कक्ष तसंच कांदळवन प्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात आलेल्या शोभिवंत माशांच्या उबवणी केंद्राचं उद्घाटन मुनगुंटीवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. मरीन मॅटर्स या व्याख्यान मालिकेचे बर्ड ॲण्ड मोबाईल या ॲप्लिकेशनचे तसंच महाराष्ट्र वन विकास महामंडळानं दिलेल्या बसचं लोकार्पण मुनगुंटीवार यांच्या हस्ते झालं. यावेळी गोल्डन क्राँड्रेज तसंच डॉ. कुलदीप लाल यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading