अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी, मासे दुकानांचा अंतर्भाव

शासनाने कोविडचा प्रादुर्भाव खंडीत करण्यासाठी ब्रेक द चेन अभियानातर्गंत दिलेल्या आदेशामध्ये आणखी काही बाबीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यात पशुसंवर्धन विभागाशी निगडीत बाबी अंर्तभूत आहेत. अत्यावश्यक सेवामध्ये दुध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि फुडशॉपचा समावेश करण्यात आला आहे. यात चिकन, कोंबडया, मटण, अंडी, मासे दुकानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. जनावरांसाठी आवश्यक असणारे पशु/कुकुट खाद्य, चारा आदिचाही समावेश केला आहे. हवामान आणि मान्सून पुर्व उपक्रम व्यवस्थापनेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी व्यापक प्रमाणात जनावरांचे मान्सून पुर्व लसीकरण केले जाते. या उपक्रमाला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. जनसामान्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाचा समावेश केला आहे. माल वाहतूक सेवेमध्ये वाहतूक आणि पुरवठा शृंखला सुरु ठेवण्यात आली असून यात दुध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे आणि जनावरांचा चारा या वस्तु आणि त्यांच्यावर प्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाची वाहतूक तसंच त्यांच्या साठवणुकीसाठी गोदामे चालविणे याबाबींचा अत्यावश्यक सेवेत अंतर्भाव होतो. सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग सुरु ठेवण्यात आले आहेत. यात अन्न प्रक्रीया, डेअरी, पशुखाद्य आणि चारा प्रक्रीया, औषध निर्मिती, लस निर्मिंती, वैद्यकीय उपकरणे निर्मिंती तसेच या सर्वांना सहाय्यभूत ठरतील अशा सेवा, त्यांची वाहतूक आणि त्यांचे विक्रेते आणि त्यांच्या सेवा समाविष्ठ केल्या आहेत.नया सेवा उपलब्ध करीत असताना संबंधितानी शासनाद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यानवतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading