येत्या मंगळवारी होणारं चंद्रग्रहण महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत दिसणार – दा कृ सोमण

येत्या मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत चंद्र उगवताना दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, अमेरिका, ॲास्ट्रेलिया येथून दिसणार आहे. या वर्षातील हे अखेरचे चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणास दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी प्रारंभ होईल. दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती होईल. संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी चंद्रग्रहण सुटेल. जेथे दृश्य आकाशात चंद्रबिंब असेल तेथे चंद्रग्रहण दिसेल. भारताच्या पूर्व भागात खग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसणार आहे. उर्वरित भारतातून खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवताना दिसेल. मुंबईत संध्याकाळी ६ वाजून १ मिनिटांनी खंडग्रास स्थितीतच चंद्र उगवेल. साध्या डोळ्यानी चंद्रग्रहणाचे दृश्य पाहता येईल. यानंतर भारतातून दिसणारे चंद्रग्रहण पुढच्या वर्षी २८ ॲाक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading