येऊरमध्ये आढळला तब्बल ९ फूटी अजगर

येऊर परिसरात एका बंगल्याशेजारी तब्बल ९ फूटी अजगर आढळून आला. हा अजगर बंगल्याजवळ अडकून बसला होता. स्थानिक नागरिकांना तो आढळून आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र पराग शिंदे यांना पाचारण केले. शिंदे यांनी वन विभागाला कळवले. आणि त्याची सुटका करून त्याला पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले. भारतातील हा सर्वात मोठा बिनविषारी अजगर असून तो अंडी देतो. सध्या सापांचा प्रजोत्पादनाचा काळ आहे. या अजगराच्या तोंडात १०० हून जास्त दात असून हा स्वत:पेक्षा मोठी शिकारही गिळू शकतो असं सर्पमित्र पराग शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading